तुळजापूर / प्रतिनिधी-

कुंभारी धनेगाव  विविध  कार्यकारी सेवा सोसायटी सहकारी संस्था  च्या चेअरमन पदी बिनविरोध  विकास पोप ट जाधव व व्हा चेअरमन पदी विष्णू वडणे यांची शुक्रवार दि३रोजी झालेल्या विशेष बैठकीत  निवड करण्यात आली.  विशेष म्हणजे चेअरमन व तेरा सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली आहे.

  चेअरमन व व्हाईस चेअरमन या पदाच्या निवडीकरीता संस्थेचे निवडणुक निर्णय अधिकारी  आर. बी. जामदार यांच्या अध्यक्षतेखाली   कुंभारी येथे सकाळी ठिक ११.०० वाजता  बैठक घेण्यात आली . यात चेअरमन पदासाठी विकास जाधव यांचा एकमेव अर्ज तो छाननीत वैध ठरल्याने चेअरमन पदी विकास जाधव  यांच्या नावाची  घोषणा करण्यात आली चेअरमन पदी विकास जाधव यांची निवड होताच त्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.  कुंकवाची उधळन करुन फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला गेला.  


 
Top