तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा ग्रंथालय चळवळीचे प्रेरक ग्रंथमित्र व. ग.सुर्यवंशी यांना अनुसया सार्वजनिक तालुका वाचनालय  यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात राज्यात ग्रंथालय चळवळीत ज्यांनी योगदान दिले आहे त्यांना हा पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक सूर्यभान पवार यांच्या नावाने रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येतो. ग्रंथमित्र व.ग. सुर्यवंशी हे सार्वजनिक ग्रंथालय चळवळीत गेल्या पाच तपाहून अधिक काम करीत आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण परभणी येथे सोमवार दिनांक सहा रोजी करण्यात येणार आहे.


 
Top