उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तेरणा अभियांत्रिकी महाविदयालय जे मुलांना नेहमीच संशोधन करण्यासाठी  प्रवृत्त करत असते अशा महाविद्यलयाचा महेश कपाले  याचे महिंद्रा रिसर्च व्हॅली मध्ये निवड झालाय असून वार्षिक पगार ६ लाख मिळाला आहे. महेश हा  २०२२ चा मेकॅनिकल विभागाचं विद्यार्थी आहे . महिंद्रा रिसर्च व्हॅली, चेन्नई येथे स्थित समूहाचे नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचे केंद्र आहे. महिंद्रा रिसर्च व्हॅली मध्ये कंपनीचे अभियांत्रिकी, संशोधन आणि ऑटोमोबाईल्स आणि ट्रॅक्टर्ससाठी उत्पादन विकास शाखा एकाच छताखाली आहेत. महिंद्रा वर्ल्ड सिटी, चेन्नई येथे महिंद्रा रिसर्च व्हॅली 125 एकरमध्ये पसरलेले आहे. महेश कपाळे हा ग्रामीण भागात शिक्षण घेतलेला विद्यार्थी असून त्याने जवाहर माध्यमिक शाळा बावी  येथून शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी तेरणा कॉलेजचे निवड महेश ने केली ." महाविद्यालयातील स्वयंमपूर्ण अध्यापनाची पद्धत आणि मुलाच्या करिअर साठी असेलेले वातावरण आणि शिक्षकाचे  मार्गदर्शन यामुळे माझी निवड झाली "असे महेश याने नमूद केले . "ऑटोकॅड आणि युनिग्राफिक या सॉफ्टवेअर मध्ये महेश चे कौशल्य आहे  आणि येणाऱ्या काळात त्याला  आणखीन मोठी संधी मिळेल . " असे मत  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केले. 

यावेळी यावेळी मेकॅनिकल विभागाची प्राध्यापक ए बी घळके व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अशोक जगताप उपस्थित होते.तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेब ,ट्रस्टी माननीय आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील साहेब , माननीय श्री . मल्हार पाटील साहेब आणि महाविद्यलयाचे समन्व्यक श्री गणेश भातलवंडे सर यांनी महेशचे अभिनंदन केले आहे .

 
Top