उस्मानाबाद/ प्रतिनिधी- 

श्री साई जनविकास प्रतिष्ठान औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडपाटी- आळणी येथे भगवान श्री विश्वकर्मा यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली.  मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे आयटीआय कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे,कृषी महाविद्यालयाचे प्रा. एन.एस.सुतार यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या जीवनाचा व कार्याचा आढावा  घेऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.प्रशिक्षणार्थींनी महाविद्यालयात स्वच्छता करून वर्कशॉप मधील मशनरींचे पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे,आयटीआय कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक हरी घाडगे,प्रा. एन.एस. सुतार, प्रा. सुनील भालेकर, प्रा.अशोक सोन्ने,प्रा.अक्षय कांबळे,विजयकुमार काळे, अभिरुद्र सुतार,आयटीआय कॉलेजचे निदेशक एस.आर.पुदाले, निदेशक एस.एस.सुतार, निदेशक आर.एस.काळे तसेच प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आयटीआय कॉलेजचे व्यवस्थापक डी.एम.  घावटे यांनी मानले.

 
Top