उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रसंत रोहिदास  महाराज यांनी सदैव समाज कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेऊन समाजासाठी व राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे असे  प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश घोडके यांनी व्यक्त केले. 

 राष्ट्रसंत रोहिदास  यांची जयंती शिंगोली आश्रम शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली.  प्रारंभी त्यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश घोडके, प्रमुख पाहुणे शिंदे कुमंत यांच्या हस्ते  करण्यात आले.    यावेळी  घोडके बोलत होते.

पुढे बोलताना घोडके म्हणाले की,  संत रोहिदासांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. कामावर विश्वास, जातीप्रथेवर विरोध, मन चंगा तो कटोरी मे गंगा हे त्यांचे काव्य जास्त परिचयाच्या आहे. भारतात त्यांना अनेक नावाने ओळखले जाते, शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये त्यांचे अनेक काव्यपंक्ती आहेत. सदैव समाज कल्याणासाठी त्यांनी कार्य केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घेऊन समाजासाठी व राष्ट्रासाठी कार्य केले पाहिजे 

 दीपक खबोले यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड, पर्यवेक्षक शेख अब्बास अली, चंद्रकांत जाधव, सूर्यकांत बर्दापुरे, खंडू पडवळ, शानिमे कैलास, कांबळे सुधीर, राठोड, सतीश कुंभार, सचिन राठोड , मदन आमदापुरे इत्यादी शिक्षक व कर्मचारी  बबन चव्हाण, रेवा चव्हाण, सचिन माळी, वसंत भिसे, गोविंद बनसोडे इत्यादी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पाटील रत्नाकर   यांनी मानले.

 
Top