उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 चिखली (ता.उस्मानाबाद) येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक रविवारी (ता.12) संपन्न झाली. निवडणुकीमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजप प्रणीत आघाडीचा जवळपास 70 मताच्या फरकाने शिवसेना (ठाकरे गट) प्रणीत बळीराजा पॅनेलने विजय प्राप्त केला. गेल्या तीस वर्षापासुन यावर डॉ.पद्मसिंह पाटील व नंतर राणाजगजितसिंह पाटील गटाचे वर्चस्व होते. यावेळी मात्र शिवसेनेने त्याना धक्का देत ही सोसायटी ताब्यात घेतली आहे. ग्रामपंचायत पाठोपाठ गावातील महत्वाच्या असणाऱ्या संस्थेवरही शिवसेनेने ताबा मिळविला आहे.

तेरापैकी अकरा जागेसाठी ही निवडणुक घेण्यात आली, त्या अगोदर दोन जागा बिनविरोध आल्या असुन त्यामध्ये एक ओबीसी प्रवर्गातील तर दुसरी भटक्या जमातीच्या राखीव जागेची होती. अकरामध्ये आठ सर्वसाधारण, दोन महिला व एक अनुसुचित जातीची जागेसाठी ही निवडणुक झाली. एकुण तीन पेट्यामध्ये 830 मतदान झाले. त्यामध्ये चारशे ते सव्वा चारशे मते घेऊन पॅनेलने मोठ्या फरकाने विजय मिळविला. यामध्ये सर्वसाधारण गटामध्ये रमेश जाधव, पवन वाठवडे, सचिन जाधव, नवनाथ बोंदर, रामेश्वर जाधव, तारक मते, रंगनाथ सावंत व श्रीपाद कुलकर्णी यांचा विजय झाला. तर महिला गटातुन विमल चव्हाण व प्रभावती जाधव या निवडुन आल्या. अनुसुचित जाती प्रवर्गातुन साहेब जावळे विजयी झाले असुन बिनविरोध मध्ये दत्ता गोरे व भागवत पोंदे यांचा समावेश आहे. पॅनेलप्रमुख माजी सरपंच देविदास जाधव यांनी सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन करुन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 
Top