तुळजापूर / प्रतिनिधी-

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ दिवसेंदिवस प्रचंड गर्दी होत असुन या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदीर उशीरा उघडत असल्याने भाविकांचे हाल होत आहेत. मंदीर उशीरा दर्शनार्थ खुले केले जात असल्याने पहाटे   अवघा एक तास दर्शनार्थ मिळत असल्याने यावेळी  एकच गर्दी होवुन याचा ञास भाविकांना होत आहे.  प्रशासनाने  गर्दी दिवशी  मंदीर  लवकर खुले करण्याची मागणी भाविकांन मधुन केली जात आहे.

 श्री तुळजाभवानी मंदिर  हे चारचा उघडण्याची वेळ असली तरी चरणतिर्थ पार्श्वभूमीवर साडेचार ते पावणेपाचला मंदीर भाविकांना दर्शनार्थ सोडले जाते म्हणजे मंदीर दर्शनार्थ पाच वाजता सुरु होते व सहा वाजता देविजींना   अभिषेक सुरु होतात.त्यामुळे पहाटे सुवर्ण अलंकार  दर्शन घेण्यासाठी एक तास वेळ मिळतो  आहे .तरी  भाविकांचे होणारी हेळसांड थांबविण्यासाठी गर्दीचा अंदाज घेवुन मंदीर लवकर उघडुन भाविकांना दिलासा देण्याची मागणी भाविकांन मधुन केली जात आहे. 


 
Top