परंडा / प्रतिनिधी - 

परंडा तालुक्यातील पाचपिंपळा  येथे  उमेद अभियान अंतर्गत उडाण महिला प्रभाग संघ , अनाळा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२३ रोजी घेण्यात आली. सर्वप्रथम  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पाचपिंपळाच्या सरपंच वंदना चौधरी , तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे , आर्थिक सामावेशन चे तालुका व्यवस्थापक मुकेश लक्षे यांच्या  हस्ते करण्यात आले.२०२१ ते २०२२ आर्थिक वर्षाचे प्रभाग संघ लेखापरीक्षण वाचन करण्यात आले.तसेच सर्व समूहाचे व ग्राम संघाचे मार्च २०२२ पर्यंत चे लेखापरीक्षण अहवाल , मूल्यांकन अहवाल , प्रभागसंघा मार्फत प्रभागात राबविण्यात आलेल्या शासकीय योजना उपक्रम सामाजिक कार्य अहवाल, प्रभाग संघास प्राप्त एप्रिल २०२१- २०२२ निधी व वितरीत निधी अहवाल, तसेच प्रभागातील आर्थिक समावेशन अहवाल वाचन प्रभाग समन्वयक प्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वंदना चौधरी , उपसरपंच गुरुदास खैरे , माजी सरपंच दिनकर खैरे  , पत्रकार अलिम शेख , हनुमत खैरे , गणेश नेटके , व्हिजन इंडिया लिमिटेड चे कार्यक्रम समन्वयक सुहास पारडे, किशोर कांबळे , शिवाजी खैरे उपस्थित होते . या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिजाऊ बिग्रेड च्या जिल्हा अध्यक्ष तथा ग्लोबल विद्यालयाच्या प्राचार्या आशा मोरजकर यांनी महिलांना अनमोल मार्गदर्शन केले. तालुका अभियान व्यवस्थापक तुकाराम ढोरे , मुकेश लक्षे यांनी उमेद अभियान अंतर्गत कामाचा आढावा घेतला . या सभेत प्रभागातील प्रेरिका नौशाद शेख , आशा कोळी , रुपाली शिंदे , कामिना वरपे , रेणुका सुर्वे आदीनी उमेद अभियानात आल्या पासून जीवनात झालेला बदल याविषयी मनोगते  व्यक्त केली . कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभाग समन्वयक विजय गवळी , समाधान माळी , प्रिया पाटील ,प्रभागसंघ व्यवस्थापक पुष्पा सावंत , प्रभागसंघ अध्यक्ष ,सचिव, कोषाध्यक्ष तसेच सर्व सीआरपी यांनी अथक परिश्रम घेतले . प्रभागसंघ वार्षिक सर्व साधारण सभेस प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्नपुर्णा ठोसर व रुपाली शिंदे यांनी केले तर आभार समाधान गवळी यांनी मानले .

 
Top