उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

रास्त भाव दुकानदारांना नियतनाप्रमाणे दिले जाणारे धान्य व प्रत्यक्षात मिळणारे धान्य यातील वजनामध्ये तफावत असल्यामुळे ती नियतनाप्रमाणे देण्यात यावी, अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.६ फेब्रुवारी रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ई-पॉस मशीनचे लाईफ संपल्याने त्यामध्ये वारंवार बिघाड होत आहेत. त्यामुळे ई-पॉस मशीन नवीन दर्जाचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा कारण जुन्या मशीन दुरुस्त होत नाहीत व त्याचे पार्टही उपलब्ध होत नाहीत. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जुलै ते डिसेंबर २०२२ पर्यंतचे दिले जाणारे कमिशन विनाशरथ त्वरित अदा करण्यात यावे. धान्य वाटप हे ऑनलाईन प्रणाली द्वारे सुरू असल्यामुळे प्रत्येक रास्त भाव दुकानदारांकडून मागविण्यात येणाऱ्या दक्षता समितीचे अर्ज बंद करण्यात यावेत. तर परंडा तालुक्यातील काही रास्त भाव दुकानदारांना नियतनाप्रमाणे परमिट देणे गरजेचे असताना प्रत्यक्ष परमिटवर धान्य कमी दिले जात आहे. तसेच शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक रास्तभाव दुकान आयएसओ करा असे सांगण्यात येते. परंतू हे आयएसओ करण्याचे ऐच्छिक असल्यामुळे त्याची सक्ती करण्यात येऊ नये. दरमहा दिले जाणाऱ्या धान्याची पोहोच प्रत्येक रास्त भाव दुकानात वेळेत करावी ही पोस्ट मशीन वर ऑनलाईन डाटा तात्काळ टाकण्यात यावा काही परवानाधारक हे अशिक्षित असल्यामुळे त्यांना बँकेकडून चेक बुक दिले जात नसल्याने त्यांच्या वारसांच्या नावे चेक घेऊन रक्कम अदा करावी. तसेच रास्तभाव दुकानदारांना प्रती क्विंटल दिले जाणाऱ्या कमिशन ऐवजी शासनाकडून फिक्स स्वरूपाचे मानधन देण्यात यावे आधी मागण्या करण्यात आलेले आहेत.  यावर जिल्हाध्यक्ष समाधान कदम, जिल्हा कार्याध्यक्ष आर्यन पाटील, सचिव मनेष सोनकवडे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रफुल्लकुमार शेटे, जिल्हा सहसचिव राजकुमार पवार, गौरीशंकर साठे काकासाहेब कासार ,प्रसाद राजेनिंबाळकर,अमर किरदतआदींच्या सह्या आहेत.


 
Top