उमरगा/ प्रतिनिधी-

तालुक्यातील आष्टा जहागीर येथे संत  रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराजांचे कार्य हिंदू धर्माची संस्कृती,महत्व पटवून धर्म   टिकविण्यासाठी देशामध्ये अगृगण्य कार्य होते.गरिबिचे चटके सोसत समाजाला ज्ञान दिले. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बरोबरीचे संत रोहिदास महाराज होते ते पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. 

निजामकाळामध्ये सबंध देशामध्ये इस्लामी धर्म असताना सुद्धा अनिष्ठ रुढी परंपरा,अस्पृश्यता विरुद्ध बंड पुकारुन आपण सर्व ईश्वराचे लेकर आहोत अशी शिकवण देत हिंदू धर्माचे कर्तव्य सागीले असे मत  शालेय शिक्षण  समिती चे माजी सभापती अशोकराव गायकवाड यांनी रविवार दि.५ रोजी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोलताना व्यक्त केले.

पारंभी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतिचे औचित्य साधून प्रतिमेचे पूजन पूष्पहार घालून श्रीफळ फोडून उपस्थिताच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी प्रा.सचिन गायकवाड,अँड सुशीलकुमार शिंदे,बसवराज कांबळे,गणेश माने, सुखदेव कांबळे,रोहिदास  विठ्ठल गायकवाड,मारुती  गायकवाड, कांबळे,बालाजी  जमादार,जिवन  सुर्यवंशी,अकाश कांबळे, कांबळे,अजय सुर्यवंशी, नंदा कांबळे,लिंबाबाई कांबळे,कोमल जमादार,पुष्पा कांबळे,सरुबाई कांबळे,काशिबाई मोरे,अरुण कांबळे,बळीराम कांबळे आदिसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


 
Top