उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पारधी समाजाने प्रशिक्षण घेवुन अर्थिक उन्नती साधावी. पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या अदिवासी पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. 

या समाजाला शिक्षण, व्यवसाय उभारुन आर्थिक सक्षम करण्याच्या उदेशाने जिल्हयातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी येथे भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांचे मार्फत व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी गावातील मुलभुत समस्याची पाहणी केली आहे. तसेच ज्या पारधी बांधवाकडे आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, शिधापत्रिका व इतर आवश्यक कागदपत्रे नाहीत अशा बांधवांना कागदपत्रे काढुन देण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. 

कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश , येरमाळा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी  दिनकर गोरे, भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक  अवधुत पौळ यांची प्रमुख उपस्थितीती होती.

 यावेळी पारधी वस्तीमध्ये समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी पहील्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल पारधी समाजातील बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांचे आभार मानले. तसेच वस्तीमध्ये रस्ते, नाले व इतर समस्या आनेक महीला पुरुषांनी पोलीस अधीक्षक यांचे समोर मांडल्या आहेत. यावेळी कार्यक्रामास पोलीस अधीकारी , पोलीस अंमलदार तसेच पारधी पिढीवरील महीला, पुरुष बांधव उपस्थिती होते.


 
Top