उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

 देशाचा उत्कृष्ट नागरीक घडण्यासाठी व आरोग्यासाठी  खेळ हा महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येकाने दररोज  किमान २ तास खेळले पाहिजे  असे प्रतिपादन सूर्यकांत भुजबळ  जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधीकारी यांनी केले.

  जिल्हा ऍम्युचर अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या वतीने  शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित जिल्हास्तर  सब-ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेच्या उदघाटना सूर्यकांत भुजबळ  जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधीकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्रीकांत हरणाळे जिल्हाक्रीडा अधिकारी,भारत जगताप अध्यक्ष जिल्हा संघटना,संजय देशमुख राज्य आदर्श क्रीडा पुरस्कार प्राप्त,कैलास लटके क्रीडा अधिकारी,विक्रम पाटील ,पवन वाठवडे,योगेश थोरबोले सचिव जिल्हा संघटना,संजय कोथळीकर,शाम जाधवर यांची प्रमुख उपस्थित होती.

  या स्पर्धेत जिल्ह्यातील ५०० ते ५५० मुले मुलींनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेतून कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड होणार आहे  , या स्पर्धेचे तांत्रिक काम माउली भुतेकर व रोहित सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषीकेश काळे,हरी खोटे,पुजारी सर,  राजेंद्र कासार,राहुल जाधव,अश्विन पवार,छाया घोडके,योगिनी साळुंके काम पाहत आहेत.


 
Top