उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेचा दुसरा टप्पा दि. 24 जानेवारी 2023 पासून उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात येत असून हा शासनाचा अत्यंत महत्त्वकांक्षी व राज्यातील सर्व महिलांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचा कार्यक्रम आहे. दिनांक 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2023 दरम्यान एनसीडी पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत १८ वर्षा वरील एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. एनसीडी आय.टी.पोर्टल वर 2011 च्या लोकसंख्या नुसार 15 लाख 91 हजार 251 च्या पैकी 94 हजार 672 लोकांची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी वय 30 वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त वय असणारे लोकसंख्या 6 लाख 36  हजार 500 असून त्या पैकी 5 लाख 99 हजार 11 लोकांची नोंद घेण्यात आली आहे.  नोंद घेण्यात आलेल्या लोकांपैकी 3 लाख 41 हजार 487 लोकांची असंसर्ग जन्य रोगां करीता तपासणी करून एनसीडी आय.टी. पोर्टल वर नोंद घेण्यात आली आहे. 3 लाख 41 हजार 487 लोकांपैकी उच्च रक्तदाब 23 हजार 680 लोकांना निदान झाले तर मधूमेह असणारे 14 हजार 639  लोकांना निदान झाले आणि त्यांना उपचार करून एनसीडी आय. टी. पोर्टल वर नोंद घेण्यात आली आहे व त्यांना योग्य ते पोषण आहार. जीवन शैलीत बदल, योगा, नियमित व्यायाम इत्यादि बाबत समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्यात आले आहे.

  18 वर्षावरील महिला आरोग्यसेवा पंधरवड्यात देण्यात येणाऱ्या सुविधा :- (दिनांक 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2023) एनसीडी पंधरवडा उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी करण्यात आलेल्या सर्व महिला रुग्णांचे निदान करण्यात येईल. संशयित कर्करोग तपासणी करण्यात आलेल्या सर्व महिला रुग्णांच निदान करण्यात येईल.अंतिम निदान झालेल्या सर्व महिलांचे कर्करोगासाठी उपचार केले जाणार आहेत. उच्च रक्तदाब आणि मधुमेह अंतिम निदान झालेल्या महिलांची आवश्यकतेनुसार तपासणी करण्यात येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सरकारी रुग्णालय अंतर्गत रुग्णांचे मॅपिंग करणे तसेच कॅन्सर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी साठी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

 मुख्य कर्करोगाची लक्षणे

 तिखट जेवण सहन न होणे. तोंड उघडताना अडचण येणे. मागील पंधरा दिवसापासून तोंडातील आतील भागाला व्रण, चट्टा. जखम. गाठ किंवा जिभेला बरी न होणारी जखम होणारी जखम होणे.

 स्तन कॅन्सर ची लक्षणे  स्तनाला गाठ येणे., स्तनाग्रतून पू किंवा रक्तस्राव होणे. स्तनाच्या आकारात बदल होणे. गर्भाशय मुख कर्करोगाची लक्षणे

 दोन मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव होणे., मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होणे., शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव होणे. योनीमार्गातून दुर्गधीयुक्त रक्तस्राव होण,

 अशी लक्षणे असल्यास जिल्हयातील 18 वर्षावरील सर्व महिलांनी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयातील माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवकुमार हलकुडे आणि यांनी केले आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी  आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा.


 
Top