उस्मानाबाद/ प्रतिनिधी

जिल्हा व तालुका स्तरीय विविध शासकीय समितीमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यासह पत्रकारांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यात यावेत, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.२२ फेब्रुवारी रोजी केली आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र व केंद्र शासनाच्यावतीने जनतेच्या विकासासाठी विविध योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा वस्ता तालुका स्तरावर समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत व येतात. या समितीवर अधिकाऱ्यासह राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समावेश करण्यात येतो मात्र पत्रकारांचा त्यामध्ये समावेश नसल्यामुळे या समितीत पत्रकारांचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे या समितीमध्ये जिल्हा व त्या त्या तालुकास्तरावर संबंधित तालुक्यातील पत्रकारांचा समावेश करण्यात यावा. तसेच पत्रकारांसाठी जिल्ह्यात अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र पत्रकारांचे अभ्यास दौरे जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून केले जात नाहीत. त्यामुळे पत्रकारांचे अभ्यास दौरे आयोजित करावेत, अशी मागणी केली आहे. यावर व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, वाशी तालुकाध्यक्ष वैभव पारवे, सलीम पठाण, पांडुरंग मते, मल्लिकार्जुन सोनवणे, कुंदन शिंदे, मुस्तफा पठाण व शितल वाघमारे यांच्या सह्या आहेत.


 
Top