तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील काक्रंबा येथे  कोरोना इज्तेमा प्रादुर्भाव नंतर प्रथमच आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय दोन दिवसीय  इज्तेमा सोहळ्यास जिल्हयातील मुस्लीम बांधवांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला. 

या इज्तेमा सोहळ्यासाठी बालाजी कानडे यांनी पाच एकर जमिन उपलब्ध करुन दिली होती.  विश्वशांती, राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाऱ्यांचा संदेश देण्याबरोबर कुरानच्या शिकवणुकीचा प्रसार यात करण्यात आला.    या इज्तेमात पाच वेळा नमाज, प्रवचन, कुरान ग्रंथ वाचनासह विविध धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडले.   विशेष म्हणजे कोविड प्रादुर्भावात काक्रंबा येथील मुस्लीम बांधवांनीही गावातील गरजुंना मोफत धान्य किट वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली होती.या पार्श्वभूमीवर हिंदू ने या सोहळ्यासाठी आपली जमिन उपलब्ध करुन  राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाऱ्यांचा संदेश दिला.


 
Top