उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. 1, वैरागरोड, उस्मानाबाद येथे दि.13 फेब्रुवारी रोजी जागतिक युनानी दिवस व आयुष विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने "युनानी दिवस" साजरा करण्यात आला.  यावेळी  धन्वतंरी प्रतिमेचे पूजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.व्ही. गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. शकील अहेमद खान यांनी मान्यवराचे शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार केला आणि लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली.

 तसेच दि.14 फेब्रुवारी रोजी हकीम अजमल खान यांच्या जन्म दिनानिमीत्त आयुष विभाग शासकीय रुग्णालय येथे आयुर्वेदीक पचंकर्म व युनानीची इलाज बील तदबीर, कंपीग थेरेपी, लीच्च थेरेपी, सर्वांग शेक यावरील थेरपीचा उद्घाटन समारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. व्ही. गलांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

  यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील अहेमद खान, डॉ. गोसावी, बालरोग तज्ञ डॉ. खुणे, युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ. अबरार अहेमद देशमुख, आयुर्वेदीक वैद्यकिय अधिकारी डॉ. गजधने मॅडम, युनानी वैद्यकिय अधिकारी डॉ. महवीश शेख, आयुर्वेदीक वैद्यकिय अधिकारी डॉ.पल्लवी कोथळकर, होमीओपॅथी वैद्यकीय अधिकारी डॉ. नौशीन खान, डॉ. सय्यद उजमा, भारत हिंगमीरे आणि औषध निर्माता सुमेध बनसोडे तसेच नागरी प्राथमिक अरोग्य केंद्र.1 येथील कर्मचारी श्री. काकडे, श्री. शिंदे, श्री.मगर, श्री.चव्हाण, श्री. सुरवसे, श्री. पाटील, श्री. माने, एल.एच. व्ही. श्रीमती सुरेखा गायगवाड, स्टाफ नर्स श्रीमती. शितल गायकवाड, श्रीमती. डुकरे, आरोग्य सेविका श्रीमती. मुंडे, श्रीमती. शेटे, श्रीमती, बारगजे तसेच श्री काझी फारुक, श्रीमती.सुरवसे, श्रीमती. शेख, श्रीमती. थोरात, मनीषा (मसाजिष्ट) असे सर्व कमचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास लाभार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. 

 
Top