तुळजापूर  / प्रतिनिधी-

-  छावा क्रांतिवीर सेनेच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवार  दिनांक 22रोजी  शासकीय विश्रामगृह येथे होऊन एकमताने  सर्वच पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य संघटनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

 छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश प्रवक्ते जीवन राजे इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश उपाध्यक्ष  बाबा रोटे व मराठवाडा संपर्क प्रमुख  अमर भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांनी जिल्हा बैठक   आयोजित केली होती. 

 या बैठकीमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पुढील वाटचालीसाठी मनोगत व्यक्त केले व संघटनेमध्ये काम करताना आलेल्या अडचणी या स्वराज्य संघटनेमध्ये येऊ नये अशी प्रमुख मागणी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले आणि त्यानंतर एकमताने  सर्वच पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य संघटनेमध्ये जाण्याचे ठरवले. 

   स्वराज्य संघटना संस्थापक अध्यक्ष  श्री छत्रपती संभाजी राजे हे  27, 28 फेब्रुवारी 2023 रोजी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये 51 शाखांच्या उद्घाटनासाठी येणार आहेत त्या निमित्ताने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. त्याबरोबरच स्वराज्य प्रमुख श्री छत्रपती संभाजी राजे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे त्या कार्यकारणीमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष  बाबा रोटे यांना राष्ट्रीय कार्यकारणी समाविष्ट  करण्यात   आले आहे. त्यानिमित्ताने यावेळी   बाबा रोटे यांचे अभिनंदन करून व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते .


 
Top