धाराशिव / प्रतिनिधी-

शहरातील खाजगी रुग्णालये ही उपचार करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांकडून मनमानीपणे पैशाची भरमसाठ लूट करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक आजारांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेले दर प्रथमदर्शनी लावावेत यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२४ फेब्रुवारी रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद शहरातील खाजगी रुग्णालय ही उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांकडून मनमानीपणे उपचाराच्या नावाखाली भरमसाठ आर्थिक भांडण करीत आहे. बेड (खाट) पासून ते ऑपरेशनचे दर अवाढव्य प्रमाणात आकारतात. तसेच रुग्णांना जीएसटी देखील दिले जात नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मनस्ताप होऊन त्यांना अतिरिक्त आर्थिक बोजा नाईलाजास्तव सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक आजाराचा उपचार करण्यासाठी जे ठरवून दिलेले दर आहे ते दर प्रत्येक खाजगी रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावल्यास आदेश देण्यात यावेत अशी मागणी, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनचे मनोज अंकुश खरे यांनी केले आहे.


 
Top