उस्मानाबाद / प्रतिनिधी-

काँग्रेस पक्षाच्या वतीने खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेले काँग्रेसचे कट्टर समर्थक सरफराज काझी यांचे उस्मानाबादेत आगमन झाले. यावेळी उस्मानाबाद शहर काँग्रेसच्या वतीने जंगी सत्काराने स्वागत करण्यात आले.

 खा.राहुल गांधी यांच्या समवेत ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सुरुवातीपासून समारोपापर्यंत म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या प्रवासात सरफराज काझी हे सहभागी झाले होते. ‘भारत जोडो’ यात्रेच्या समारोपानंतर त्यांचे उस्मानाबाद शहरात आगमन झाले. यावेळी शहर काँग्रेसच्या वतीने त्यांचे जंगी सत्काराने स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उस्मानाबाद जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, डॉ.स्मिता शहापुरकर, महिला प्रदेश सरचिटणीस शीला उंबरे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. जावेद काझी, मुहीब शेख, शहर कार्याध्यक्ष अलीम शेख, उपाध्यक्ष आरेफ मुलाणी, जमील सय्यद, इरफान कुरेशी, युवक काँग्रेसचे इम्रान हुसैनी, नियामत मोमीन, कफिल सय्यद, महादेव पेठे, संतोष पेठे, विष्णू पेठे, शाकेर काझी व इतर उपस्थित होते.


 
Top