उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पिडीत शेतकऱ्यांची वर्ग-02 संदर्भात   दि.  06-02-2023 रोजी शेतकरी बचाव कृती समितीचे कार्याध्यक्ष  सुधीर (अण्णा) पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपन्न झाली.

 या बैठकीत वर्ग-02 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या स्टेटमेन्टचा एकमताने निषेध नोंदविला, कारण    वर्ग -01 मधील जमिनी अचानक कोणतीही पुर्व सुचना न देता वर्ग-02 करणे तसेच शेतकऱ्याकडून प्रचंड नजराणा मागणी करणे व न भरल्यास जमिनी जप्त करण्याची धमकी देणे हा एक प्रकारचा महसूल दहशतवादच आहे.  शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने कलेक्टरला निवेदन दिले आहे. मोर्चा नेला यावर प्रशासनाने गंभीर्याने शेतकरी अनुकूल निर्णय घेणे ऐवजी शेतकऱ्यांना आठ दिवसात नजरांना भरा, नाहीतर शेती जप्त केली जाईल. अशा नोटीसी पाठवल्यामुळे शेतकरी प्रचंड दहशतीत आहे. अशी नोटीस पाठवून कायदेशीर खंडणी मागून दहशत बसवली गेली आहे.   शेतकरी आत्महत्या व आत्मदहन करण्याच्या विचारात होते. म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवर्त करणाऱ्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच शेतकरी कृती समितीचे आंदोलन चालू आहे.   या बैठकीत सर्व पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी  कांही  निर्णय  बैठकीत घेतले गेले. तसेच शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असा प्रयत्न शेतकरी बचाव कृती समिती करत राहील. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानिक लढा आणखीन तीव्र करण्याचा निर्धार  सुधीर पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीत शेतकरी, पदाधिकारी  तसेच  सुभाष  पवार, उमेश राजेनिंबाळकर , अर्जुन भगवानराव पवार, अभिजीत पवार,  आनंद जगदाळे, संजय सी.पवार, फिरोज पल्ला,  अरूण महाजन,  भारत पवार,  अजिंक्य पवार, अजित राजेनिंबाळकर आदींची उपस्थिती होती. 


 
Top