उमरगा/ प्रतिनिधी-

बदलत्या शैक्षणिक गरजा प्रमाणे पारंपारिक शिक्षणात बदल करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे किमान कौशल्यावर अधारित रहाणार आहे. शिक्षण व्यवस्थेत समानता आणण्यासाठी नवीन शेक्षणिक धोरण आणण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे देशातील सर्वच राज्यातील विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी मिळणार आहे. शिक्षण हे समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्या मुळे बदलत्या काळा प्रमाणे बदलत्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या स्वागता साठी सज्ज रहा. असे अवाहन प्राचार्य डॉ. दिलीप गरूड यांनी केले.

१४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आदर्श महाविद्यालयाच्या वतीने साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. दिलीप गरूड बोलत होते. उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. गरूड म्हणाले कि - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणातून जातपात विरहित समाज निर्मिती अपेक्षित होती. स्वातंत्र्य , समता , बंधुता या शैक्षणिक मुल्यांची जपणूक होणे अभिप्रेम होते. शिक्षण व्यवस्थेत मात्र शैक्षणिक  विश्मता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला आदर्श लोकशाही दिली आहे.आपला लोकशाही देश संविधानावर चालतो. स्वातंत्र्य , समता , बंधुता हि संविधानाची प्रमुख मुल्य आहेत. शिक्षण हा समाज संस्काराचा मुलभूत पाया आहे. त्या मुळे सर्वांनाच शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. शिक्षणाचे आकर्षण वाढविण्यासाठी नवीन शेक्षणिक धोरणाची निर्मिती होत आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे कार्यपध्दतीवर अवलंबून असणारे रहाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणा मुळे शिक्षणाचे विकेंद्रीकरण थांबण्यास मदत होणार असल्याचे संकेत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्याना त्यांच्या इच्छे प्रमाण शिक्षण घेणे शक्य होणार आहे. बदलत्या काळा प्रमाणे शिक्षण क्षेत्रातही बदल होत आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे अवानात्मक असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अवाहने पेलण्याची सर्वानाच तयारी ठेवावी लागणार असल्याचे डॉ. गरूड म्हणाले . उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराची पार्श्वभूमी स्पष्ट केली. प्रास्ताविक प्रा.डॉ. भास्कर शिंदे यांनी केले. विद्यापीठ नामविस्तार दिना निमित्त घेण्यात आलेल्या निकीता बिराजदार , वेदांत देशपांडे , गायित्री इंगळे या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा.डॉ. भीमाशंकर खरोसे यांनी केले. आभार प्रा.डॉ. फुलचंद पवार यांनी मानले. कार्यक्रमा साठी प्राध्यापक , विद्यार्थी , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 
Top