उमरगा/ प्रतिनिधी-

लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज असुन माणूस म्हणून जगण्याच्या सामान्य माणसाच्या इच्छेचा आदर करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. याच विचारांचा जागर गेली सातशे वर्षे संत साहित्याने केला आहे.  “समता ही वारकरी समाजाचा मुख्य गाभा आहे. आपले संविधान कोणत्याही संकुचित ओळख असलेल्या लिंग, जाती, धर्म, प्रदेशाच्या आधारावर भेद करत नाही. तीच भूमिका आपल्या वारकरी संतांनी मांडली आहे. आपल्या समाजातील प्रत्येक जातीतले आणि धर्मातले संत आहेत. कबीर, लतिफा, शेख महंमद ही मुस्लिम धर्मातील संतांची मोठी नावे आहेत. वारकरी संप्रदायाने मानलेला पाचवा वेद म्हणजे तुकारामांची गाथा प्रकाशित करण्याचे काम ख्रिश्चन असलेल्या ग्रँट अलेक्झांडर यांनी केलं होतं याची विशेष नोंद घ्यावी लागेल.” असे मत ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर (मुंबई) यांनी व्यक्त केले.

शहरातील रोटरी क्लब व व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजीत तीन दिवसीय व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी  शुक्रवारी (ता.१२) रोजी ओम साई सांस्कृतीक सभागृहात 'संत साहित्यातील संविधान मुल्य' या विषयावर ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर बोलत होते.

माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे अध्यक्षस्थानी होते. 

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधिर पवार, माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, कार्याध्यक्ष नितीन होळे, प्रदीप चालुक्य, रोटरीचे अध्यक्ष अजित गोबारे, सचिव रणजित बिराजदार, मनिष माणिकवार, शिवप्रसाद लड्डा उपस्थित होते.

पुढे बोलताना ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावर भर देणारा आहे. “वारकरी संप्रदाय आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंत तुम्हाला मदत करतात ही शिकवण देते. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’, या संत सावतामाळी यांच्या ओळींवरून कर्तव्याला संतांनी दिलेले महत्त्व दिसून येईल.” असेही त्यांनी सांगीतले.

संताजी चालुक्य, अरूणकुमार रेणके, उपस्थित होते. अनिल मदनसुरे, संतराम मुरजानी, कमलाकर भोसले, संजय ढोणे, मनिष सोनी, प्रविण स्वामी, डॉ. राजकुमार कानडे, डॉ. सिद्राम ख्याडे,, सतिष साळूंके, राम बोधे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.  प्रविण स्वामी यांनी सुत्रसंचलन केले.   कमलाकर भोसले यांनी आभार मानले. यावेळी व्यापारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top