उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जवळपास १५० हुन अधिक समुदाय आरोग्य अधिकारी यांनी एक दिवसीय लाक्षणिक कामबंद आंदोलन केले. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे प्रमुख समुदाय आरोग्य अधिकारी त्यांच्या अनेक मूलभूत मागण्यांसाठी पाच वर्षापासुन शासन दरबारी प्रयत्नशील होते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटने मार्फत आज १६ जाने. रोजी राज्यव्यापी आंदोलन पुकारले. आंदोलनात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व निर्देशानुसार
समुदाय आरोग्य अधिकारी यांना शासन सेवेत नियमीत करुन गट ब चा दर्जा मिळणे, वेतनवाढ व ईतर भत्ते मिळणे, बदली धोरण लागु करणे, बढती धोरण लागू करणे , T.A & D.A मिळणे , विमा संरक्षण व भविष्य निर्वाह निधी धोरण लागू करणे आदी मागण्या आंदोलनाच्या निमित्ताने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यानी मांडल्या आहेत.यांच्या मागण्यासाठी मॅग्मो,निमा,महाराष्ट्र युनानी मेडिकल अशोसिएशन,महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना अशा विविध संघटनेनी समुदाय आरोग्य अधिकारी संघटना उस्मानाबाद जिल्हा या संघटनेला संपासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. वरील मागण्यासंदर्भात शासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करुन कोणताही निर्णय न घेतल्यास दि.२३/०१/२०२३ पासुन सर्व समुदाय आरोग्य अधिकारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा संघटनेच्या वतीने बोलताना जिल्हाध्यक्ष डॉ.विलास तोडकर यांनी दिला आहे त्यामुळे ग्रामीण आरोग्य यंत्रणा सलाईंवर जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी उपस्थित राज्य संघटक डॉ.सुरज मोटे,जिल्हा समन्वयक डॉ.नितीन शिंदे,जिल्हाध्यक्ष डॉ.विलास तोडकर,जिल्हा-सचिव डॉ.सागर कुंभार,तालुका प्रतिनिधी डॉ.गणेश धज,डॉ.सुरज मगर,डॉ.रविंद्र वाघमारे,डॉ.सुहास भोसले,डॉ.आकांक्षा पाटील,डॉ.महादेवी दिवाणे,डॉ.राहुल अडसूळ,डॉ.आदेश तांबे,डॉ.सुरज पवार,डॉ.सचिन गुटाळ, व तसेच समुदाय आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.