उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 काही कामानिमित्त आमच्या सहयोगी पक्षाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री  तानाजी सावंत यांना भेटायला गेलो असता भगवा गमजा गळ्यात टाकून फोटो काढण्यात आले होते. आम्हाला भगव्याचं कोणतेही वावग नाही. ते आमच्या सहयोगी पक्षाचेच नेते आहेत, मात्र आम्ही कुठल्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतलेला नाही. हे वृत्त पूर्णतः खोटे व चुकीचे आहे.अशी माहती,गणेश करंजकर तालुका उपाध्यक्ष भाजपा  उस्मानाबाद यांनी दिली आहे. 

  मी तडवळा ग्रामपंचायतीचा सदस्य असून भाजप भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष आहे. पक्षाकडून यापूर्वी मी जिल्हा परिषदेची निवडणूक देखील लढवली आहे. पक्षासाठी व जनतेसाठी सदैव कार्यरत असून अशाच कामानिमित्त ना. तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. असाच प्रसंग जवळा (दु) गावचे उपसरपंच श्री आप्पा गुळवे, ग्रामपंचायत सदस्य श्री लखन वाघमारे व पंचायत समिती माजी उपसभापती श्री सुधीर करंजकर यांच्या बाबतीत घडला आहे. आम्ही कोणीही दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला नसून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते पदाधिकारी आहोत. त्यामुळे कुठलाही गैरसमज नसावा.

 आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करत असून कुठल्याही दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा आम्ही सर्वांनी जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे यांना आज भेटून केला आहे.

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, अरुण निकम आदी मान्यवर उपस्थित होते..

 
Top