तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे ग्रामपंचायत मध्ये (दि23) आज रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.  नवनिर्वाचित सरपंच कालिदास खताळ व शिवसेना ग्रामपंचायत सदस्य सौ सविता दिलीप बंडगर यांच्या हस्ते प्रथमता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

   यावेळी शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन  बंडगर, ज्येष्ठ शिवसैनिक कालिदास सुरवसे उमेश खांडेकर, युवा सेना शाखाप्रमुख दीपक भिसे, शिव अल्पसंख्याक सेना विभाग प्रमुख अहमद अन्सारी, उमेश खांडेकर, सोमनाथ सुरवसे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विकास भिसे, सद्दाम मुलानी, नागनाथ खताळ, पवन वाघमारे, सोमनाथ घोगरे, समाधान पाटील, सुजीत घोगरे हरिदास वट्टे शहाजी नन्नवरे रोहित मेत्रे बालाजी गोडसे अमित बंडगर आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


 
Top