उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त आज उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया आणि जय भवानी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला.

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर. एस. गुप्ता, प्रमुख वक्ते प्राध्यापक राजेंद्र आत्रे, जेष्ठ मराठी साहित्यीक, कवी आणि सुप्रसिध्द चित्रकार उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हा न्यायाधीश -2 के. ए. बागे पाटील, जिल्हा न्यायाधीश -3 व्ही. जी. मोहिते,  न्यायाधीश विक्रम आव्हाड,  गोंदियाचे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर सडक अर्जुनी,  वर्धा येथील हिंगणघाटचे 2 रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर बाळासाहेब गंगाधर पवार, जिल्हा शासकीय अभियोक्ता शरद जाधवर आणि जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मुंढे हे उपस्थित होते.

  प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले. प्राध्यापक राजेंद्र आत्रे यांनी मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेची संस्कृती चे महत्व कवितेच्या स्वरुपात उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश -2 के. ए. बागे-पाटील यांनी मनोरंजनात्मक शैलीत भाषेचे प्रयोग तसेच वापर करुन मराठी भाषा कशी आहे हे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्र. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर. एस. गुप्ता यांनी मराठी भाषेचे न्यायालयात असलेले स्थान, उपयोग, सांगितले.

  या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन विधीज्ञ मंडाळाचे विधीज्ञ एम. बी. माढेकर यांनी केले या कार्यक्रमास न्यायालयातील न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top