उस्मानाबाद / प्रतिनिधी-
नुकत्याच झालेल्या नागपुर अिधवेशनामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजन लागू करा, या संदर्भात आवाज उठवला होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी  आपण सभापती महोदयाकडे लेखी दिले आहे की शिक्षकांना जुनी पेन्शन योजना बाबत धोरणात्मक निर्णय लागू होत नाही तोपर्यंत आमदार म्हणून आपल्याला देय असलेले पेन्शन देण्यात येऊ नये याप्रमाणे आपण लेखी दिले आहे अशी माहिती औरंगाबाद  शिक्षक   मतदारसंघातील उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली
 शिक्षक आ.वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसा जोपासत शिक्षक, कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण बांधील आहोत. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी यावेळेसही शिक्षक मतदार आपल्या पाठीशी असल्याचे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), रिपाइं (खरात गट) महाविकास आघाडी व विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार विक्रम काळे यांनी सांगितले.  औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने आ.काळे यांनी बुधवारी (दि.18) उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन शिक्षक, कर्मचार्‍यांशी संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रदेश सचिव मसूद शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जि.प.चे माजी गटनेते महेंद्र धुरगुडे, शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अामदार विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या वििवध प्रश्नांवर आवाज उठवून आपण त्यांना न्याय मिळवून दिला. कोणताही जातीभेद व पक्षभेद न करता शाळा -कॅलेज तिथे आमदार निधी आपण दिला. शाळा-कॉलेजचा कायम अनुदानीत हा शब्द काढण्यास आपल्याला फार मोठे यश मिळाल्याचे अामदार काळे यांनी सांगितले. 
 
Top