उस्मानाबाद / प्रतिनिधी-

रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्त उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा व वाहतूक चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 18 जानेवारी 2023 रोजी उस्मानाबाद शहरात वाहतुक कायदा- नियम पाळण्यासंबंधाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत उस्मानाबाद शहरातील एकुण 07 शाळांचे विद्यार्थी- शिक्षक यांनी सहभाग घेतला. 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी रॅलीतील उपस्थितांना पोलीस अधीक्षक कार्यालय येथे वाहतुक कायदा- नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले व हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. सदर रॅली ही पोलीस अधीक्षक कार्यालय- जिल्हाधिकारी कार्यालय- छत्रपती शिवाजी महाराज चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गे निघून महात्मा फुले चौक येथे संपवण्यात आली.

 यावेळी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, वाहतुक शाखेचे सपोनि- अमित मस्के, वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार तसेच वाहतूक चालक मालक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष- मेनुद्दीन पठाण, रिक्षा युनियनचे - जल्लालभाई तांबोळी यांसह विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top