उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्तीसंग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पुर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त स्वामी रामानंद तीर्थ जन्मस्थळ ते समाधीस्थळ पवित्र माती मंगल कलश संवाद यात्रेचे स्वागत मराठवाडा मुक्ती संग्राम समितीच्या वतीने व हिप्परगा (रवा) ग्रामस्थांनी केले.सर्वप्रथम नरसिंह मंदिरामध्ये मंगल कलश ठेवण्यात आला व 1921 सली अनंतराव कुलकर्णी व व्यंकट देशमुख या बंधूंनी सर्वप्रथम   होनाळकर (सावकार) यांच्या वाड्यामध्ये  राष्ट्रीय शाळेची स्थापना केली त्या वाड्यातील पवित्र माती मंगल कलशांमध्ये घेतली व नंतर  14 जानेवारी 1931 साली मकर संक्रांतीच्या दिवशी व्यंकटेश खेडगीकर यांनी नारायण स्वामी  यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यांचे नामकरण स्वामी रामानंद तीर्थ असे झाले.तो ओढा गणपत कोंडीबा लोमटे यांच्या शेतात जाऊन तेथील पवित्र माती  श्री.गणपत लोमटे यांच्या हातून  कलशात घेतली. 

 ज्या ठिकाणी राष्ट्रीय शाळा होती  त्या ठिकाणच्या स्मारका जवळ सरदार वल्लभाई पटेल स्वामी रामानंद तीर्थ व गोविंद भाई सराफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, व पवित्र माती  कलशात घेतली. 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समितीचे मार्गदर्शक श्री.बुबासाहेब जाधव, लोहारा पोलीस निरीक्षक

श्री.अजित चिंतले, श्री.पंडित जाधव, (गुरुजी) श्री.दिनकर देशमुख, (गुरुजी) पोलीस पाटील.श्री.संजय नरगळे, श्री.विनोद मोरे, श्री.अनिल अतनुरे, व ग्रामस्थ या मान्यवरांच्या उपस्थित  पवित्र मंगल कलश पवित्र मराठवाडा भुमिपुत्र श्री. नितीन चिलवंत व श्री. शिवकुमारसिंह बायस यांच्या कडे आनंदाने देण्यात आला.

   स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाच्या सर्व शिक्षक व  कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले व मराठवाडा जनविकास संघ ,महाराष्ट्र राज्य यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढयाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना भारत सरकारचा सर्वाच्च पुरस्कार 'भारतरत्न ' मिळावा या अभियानात आनंदाने सहभागी होणार म्हणुन सांगितले. व सर्व शिक्षक विद्यार्थी व गावकरी यांनी सांगितले कि मराठवाड्याच्या भुमितील पुत्रांनी जो भारत रत्न मिळावा म्हणुन जो लढा उभा केला आहे त्यास हिप्परगा (रावा) गावकरी ही सकारात्मक साथ देणार अस सांगितले.

 हिप्परगा (रवा) येथील पवित्र माती मंगल कलश कार्यक्रमाची प्रास्ताविक मुख्याध्यापक. श्री. संजय भोईटे व संकल्पना श्री. नितीन चिलवंत यांनी सविस्तर पणे मांडली . श्री. शिवकुमार बायस यांनी हिप्परगा (रवा) येथील सर्व मान्यवरांचे मना पासुन आभार मानले. व गावकऱ्यांच्या वतीने श्री पंडित जाधव (गुरुजी) यांनी आभार व्यक्त केले व राष्ट्रगीताने समारोप झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुरलीधर होनाळकर, विठ्ठल होनाळकर, सुशांत मोरे ,सोमनाथ मोरे ,बालाजी मोरे, किरण देशमुख, अमोल मोरे, गणेश नरगाळे, परमेश्वर पाटील,  सिद्धेश्वर गिराम, महादेव कांबळे, रावण कांबळे, रामकृष्ण मुळे,  युवराज जाधव, बबन नरगाळे, बळीराम जाधव, विठ्ठल गाटे आदिंनी सहकार्य केले.

 
Top