उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा  अर्चनाताई पाटील यांनी  तुळजापूर तालुक्यातील जवाहर कला वाणिज्य, सायन्स कॉलेज,अणदूर, जवाहर  उच्च माध्यमिक विद्यालय, अणदूर तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बालाघाट शिक्षण संस्था, नळदुर्ग तसेच सय्यद अब्दुल्ला शाह मेमोरियल उर्दू प्राथमिक शाळा, नळदुर्ग येथे भेटी देवून शिक्षकांशी संवाद साधला..

 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.श्री.किरण पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शिक्षकांशी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच आपले पहिल्या पसंतीचे मत प्रा.किरण पाटील यांनाच द्यावे असे आवाहन केले.


 
Top