तुळजापूर /  प्रतिनिधी 

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे प्रजासत्ताक दिनी हिंदुराष्ट्र सेनेने जवाहार थिऐटर्स मध्ये  लागलेल्या  पठाण चिञपटाचे पोस्टर्स फाडुन शो बंद करून चित्रपटाला  कडाडून विरोध केला. 

सदरील शो नंतर पोलिस बंदोबस्तात पुन्हा पठाण चिञपट  प्रैमीसाठी चालु केला असता सकाळी झालेल्या राड्यामुळे प्रेक्षकांचा चिञपटाला कमी प्रतिसाद लाभला.  गुरुवार दि.२६ रोजी हिंदुराष्ट्र सेनेच्या दहा कार्यकत्यांनी  वादग्रस्त चित्रपट पठाण चे जवाहर थिएटर्स समोर लावलेले   पोस्टर फाडले  तसेच पाकिस्तान विरोधी घोषणा देऊन व शाहरूख खान विरोधी घोषणा देऊन चित्रपटास विरोध व्यक्त केला.  यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top