उस्मानाबाद /प्रतिनिधी   

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिओ कंपनीच्या परिसर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले होते.

       या कार्यक्रमासाठी जिओ कंपनीचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक श्री बालाजी पाटील आणि तुषार बुके हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजा जगताप, प्रमुख उपस्थिती प्रा. माधव उगिले नॅक सहसमन्वयक डॉ. संदीप देशमुख हे लाभले होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आभार स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले. प्रस्तुत मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top