उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये इ. ६ वी च्या विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला.
आनंद मेळाव्यातील विद्यार्थ्यांनी घरी बनवून आणलेल्या विविध पदार्थांची विक्री करुन रुपये ३४००० चा व्यवसाय केला या मेळाव्याचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील मुख्याध्यापक एस.एस. देशमुख , उपमुख्याध्यापक एस.बी. कोळी ,राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी पर्यवेक्षक वाय.के. पठाण, पर्यवेक्षक के.वाय. गायकवाड , वाय. के. इंगळे,आर.बी . जाधव,टि. पी.शेटे,डी.ए. देशमुख उपस्थित होते. विद्यार्यांनी स्वतः बनवलेले रुचकर पदार्थ विविध हस्तकला वस्तूंची विक्री करून रुपये ३४००० चा व्यवसाय केला या आनंद मेळावा व्यवसायातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान , नफा - तोटा , व्यसायासंबधी ज्ञान मिळण्यास उपयुक्त असा अनुभव आल्याचे विद्यार्थ्या समवेत पालकांनी मत व्यक्त केले .आनंद मेळावा यशस्वीतेसाठी श्रीमती एस. एस . शिंदे ,आर.बी. चौधरी, सौ. व्ही.एल. पवार,पी.एस. मोरे, सौ.एम.पी. ठाकूर , श्रीमती एस.एस. ईश्वर गौडा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद यांनी परिश्रम घेतले .