तुळजापूर / प्रतिनिधी-

मौजे इटकळ येथे श्री.ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास मित्ती माघ शके १९४४ रविवार दि.२२ जानेवारी रोजी मोठया उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सांगता माघ शके १९४४ शनिवार दि.२८ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. हभप  गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हभप.नागनाथ स्वामी यांच्या अधिष्ठानाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे.

  या सप्ताह सोहळ्यातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रम होणार आहे.  शनिवार  दि.२८ जानेवारी रोजी हभप  नितीन महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन तर हभप आप्पासाहेब महाराज यांच्या हस्ते काला वाटप करण्यात येणार आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन व किर्तननाचा लाभ घ्यावा,असे आवाहन इटकळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 
Top