तुळजापूर /  प्रतिनिधी  

 तुळजापूर शिवारात उस्मानाबाद  बायपास परिसरात असणाऱ्या विलास जगदाळे यांच्या शेतातील ऊसास  अचानक आग लागली आग विझवण्यासाठी नगरपरिषद अग्नीशामन दलाची गाडीत अचानक  बिघाड झाल्याने यात  सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाला. 

सदरील घटना शनिवार दि.२८रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली.सदरील उसाचा फडास शाँर्टसर्कीट की अन्य कारणामुळे   आग लागली  याचे नेमके कारण कळु शकले नाही. सदरील जळालेल्या उसाचा पंचनामा करण्यात आला आहे. 

 तुळजापूर शिवारातील सर्वे नंबर ६१ मधील विलास जगदाळे यांच्या मालकीचा शेतातील उसास अचानक सकाळी साडेअकरा वाजता आग लागली नगरपरिषद तुळजापूर अग्नीशमन दलाचीगाडी घटना स्थळी आली असता गाडीतील बिघाडा मुळे आग विझवणे शक्य  न झाल्याने  यात    चार एक्कर ऊस जळून खाक झाला.  .शेतकऱ्यांचे लाखो रुपये आगीत भस्मसात झाले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


 
Top