तेर/ प्रतिनिधी-

शासकीय तंत्रनिकेतन उस्मानाबाद, आयोजीत School Connect या उपक्रमाअंतर्गत तंत्रशिक्षणातील संधी, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महत्त्व आणि पॉलीटेक्निक प्रवेश प्रक्रिया इ. बाबतची माहिती यावेळी देण्यात आली.

ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना मिळावी यासाठी आज दिनांक- 03 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र संत विद्यालय, तेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता वाकुरे टी. एस. यांनी उपस्थित इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच याप्रसंगी तंत्रनिकेतनचे अधिव्याख्याता  ताकमोगे एस. यु.,. साळुंके एस. बी. व शाळेचे मुख्याध्यापक बेद्रे जे.डी., बळवंतराव एस.एस. , महादेव भंडारे  उपस्थित होते.


 
Top