तेर/  प्रतिनिधी  

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी गावातील महिलांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

तेर ता .उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठच्या वतीने शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनीच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात

 त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनीच्या गुणवत्तेविषयी समन्वय साधता यावा यासाठी शाळेच्या वतीनेही विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात त्यानुषंगाने रोजी जिल्हा परिषद पेठ शाळेत मुख्याध्यापक गणपती यरकळ , सहशिक्षक गोरोबा पाडुळे , शशिकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील महिलांसाठी हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी गावातील महिलांनी ही या हळदी कुंकू कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षिका  शेजाळ वर्षा , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते


 
Top