उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे  जिल्हा न्यायालयाचे सर्व कामकाज ई प्रणाली द्वारे करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती आणि उस्मानाबादचे पालक न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी उस्मानाबादच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य एडवोकेट मिलिंद पाटील उस्मानाबाद जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मुंडे उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात यावेळी ई-फायलिंग ई-पेमेंट ई कोर्ट सर्विसेस मोबाईल ॲप ई-पेमेंट आणि ई लायब्ररी  या विभागांचे उद्घाटन न्यायमूर्ती पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणची न्यायालय इ प्रणालीवर कार्य करत असून जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील 500 वकिलांनी इ प्रणालीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी यावेळी दिली.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उस्मानाबाद हे जिल्ह्यातील संगणक प्रणाली द्वारे चालणारे पहिले कोर्ट असल्याची तसंच लवकरच उस्मानाबाद यासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांचे पेपरलेस कामकाज चालू होईल, अशी माहिती ही माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 न्यायमूर्ती पेडणेकर यांनी या ई संगणकीय प्रणालीमुळे कोर्ट कामात गतिमानता तसेच पारदर्शकता येऊन पक्षकारांचा न्यायालयाचा आणि वकिलांचा वेळ वाचणार आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होणार असल्याचे सांगितलं.

तर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य एडवोकेट मिलिंद पाटील यांनी या ई कोर्ट साठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भरघोस निधीची तरतूद केली असून महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल कडून यासाठी पूर्ण मदत करण्याची ग्वाही दिली.  यावेळी ई-कोर्ट विषयी प्रथम वर्ग न्यायाधिश मिलिंद निकम यांनी माहिती दिली. 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक न्यायाधिश श्रीमती एन.एस. सराफ यांनी केले तर सुत्रसंचालन वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.डी. कामत व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.एस.जी चालकर यांनी केले. आभार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.टी इंगळे यांनी मानले.

 
Top