उमरगा / प्रतिनिधी-

 उमरगा शहरातील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त  बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्यावतीने उमरगा व लोहारा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा शुक्रवारी दि.6 जानेवारी रोजी यथोचित सत्कार करुन तीन वर्षाचा एक लाख रुपयाचा विमा उतरवण्यात आला.

 भाऊसाहेब बिराजदार बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्यावतीने सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करून धावपळीच्या काळात जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करण्यासाठी सातत्याने वेळप्रसंगी रात्री - अपरात्री माहिती संकलन करण्यासाठी धावणाऱ्या पत्रकारांना सुरक्षितता मिळावी म्हणून तीन वर्षाचा एक लाख रुपयाचा संरक्षण विमा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, तालुकाध्यक्ष संजय पवार, गोवींदराव साळुंके ,दत्ता वाडीकर ,उपस्थित होते.

 या कार्यक्रमाला उमरगा - लोहारा तालुक्यातील पत्रकार अविनाश काळे, गुणवंत जाधवर , प्रा . महेश मोटे ,नारायण गोस्वामी, अंबादास जाधव, समीर सुतके , रवि अंबुसे, विलास वाडीकर, मारुतीराव कदम, सुभाष जेवळे, अरुण इगवे, शंकर बिराजदार, प्रदीप भोसले, महादेव पाटील,प्रा. युसूफ मुल्ला , रफिक पटेल, अमोल पाटील, विकास गायकवाड, सचिन बिद्री, महेबूब पठाण, शरद पवार, जाफर जमादार,  रोहित गुरव, विश्वास सोनकांबळे, माधव सूर्यवंशी, नंदकुमार जाधव, गुंडेराव दूधभाते, अमोल गायकवाड, सिद्राम देशमुख, दत्ता नांगरे, आकाश पोतदार, तानाजी घोडके, दिनेश पाटील, तानाजी सूर्यवंशी, आदिनाथ भालेराव, ख्वाजा मुजावर, लक्ष्मण पवार, संजय कांबळे,विशाल देशमुख,  नवनाथ शिंदे,  रवि चव्हाण यांच्यासह पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते .

 
Top