उस्मानाबाद / प्रतिनिधी-

‘कम्युनिटी ॲन्ड सिटीझन पार्टिसिपेशन इन ऍक्सेस हू जस्टिस’ या अष्यापन अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून टी.आय.एस.एस. मुंबई येथील एल.एल.एम. च्या 37 विद्यार्थ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद येथे भेट दिली. सदर वेळी पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत राबविलेले वेगवेगळे उपक्रम (पोलीस काका, पोलीस दिदी, भरोसा सेल, पिंक पथक, गुन्हेगार दत्तक योजना, सेंद्रीय शेती) यांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सामाजिक कायदे, ग्रामीण भागातील कायदेशीर समस्या याबाबत देखील सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम समन्वयक म्हणून टी.आ.एस.एस., तुळजापूरचे उपसंचालक- श्री. डॉ. रमेश जारे, डॉ. देवकुमार जेकब, प्रा. रोहित जैन, श्री. गणेश जादरे, आरुषी मलिक यांसह मा. पोलीस अधीक्षकांचे वाचक सपोनि- श्री. श्रीकांत भराटे यांनी काम पाहिले.


 
Top