उस्मानाबाद / प्रतिनिधी-

लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या वतीने अणदूर ता.तुळजापूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी सौ. अर्चनाताई पाटील यांनी माता-भगिनींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चर्चे दरम्यान महिलां भगिनी व कार्यकर्त्यांनी ओपन जिम व वॉकिंग साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी महिलांशी विविध विकास योजनांबाबत चर्चा केली. अनेक योजनांचा महिला-भगिनींना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. अगोदर महिलांना उघड्यावर शौचालयास जावे लागत होते. मात्र पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी 'इज्जत घर' या योजनेची सक्ती करून परिवर्तन घडविले. महिलांच्या उन्नतीसाठी मा.मोदी साहेबांनी नेहमीच उपयुक्त निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या संवेदनशीलते मुळेच देश-विदेशात त्यांना सन्मान मिळतो आहे.  

 या कार्यक्रमात परिसरातील नंदगाव, खुदावादी, चिवरी आदी गावातील नवनियुक्त महिला सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अधिकाधिक संख्येने महिलांनी राजकारणात यावे असे आवाहन केले. बचत गटातील महिलांशी देखील चर्चा केली. बचत गटातील महिलांनी नवीन उद्योग व्यवसाय उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यासाठी महिलां पुढे आल्यास त्यांना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सौ. अर्चनाताई पाटील यांनी सांगितले. यावेळी उपस्थित महिलांना वाण भेट देण्यात आले.  शिक्षण महर्षी सि.ना.आलुरे गुरुजी यांच्या जीवन चरित्रावर आधारित उत्कृष्ट पुस्तक लिहिल्याबद्दल डॉ.अनिताताई मूदकण्णा यांचा सत्कार करण्यात आला.  

 याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती अस्मिताताई कांबळे, भाजप महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पुनगुडे, भाजपा महिला मोर्चा प्र.का.सदस्य मनीषाताई केंद्रे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे, तसेच गावातील प्रमुख महिला कार्यकर्त्या  माधुरीताई दीपक आलुरे,  मीराताई साहेबराव घुगे,  अनुराधा बालाजी तावडे,  अनुजा प्रशांत कुलकर्णी, सौ.विद्याताई दयानंद मुडके तसेच अँड.दीपक आलुरे,  साहेबराव घुगे, बालाजी पापडे, प्रशांत कुलकर्णी,  दयानंद मुडके, अनिल कुलकर्णी,  इमाम शेख,  निलेश आलुरे,  शिवकुमार स्वामी आदींसह बचत गटातील महिला सदस्य, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व  महिला भगिनी उपस्थित होते.


 
Top