तुळजापूर/ प्रतिनिधी-
तुळजापुर तालुक्यातील पिंपळा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे तामलवाडी येथील बालाजी अमाइन्स कारखान्याच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या वर्ग खोल्यांचे भूमीपूजन बालाजी अमाईन्सचे तांत्रिक सल्लागार एम.एम. बिराजदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच रुक्मिणी काळे , उपसरपंच शुभम कदम ,बालाजी पाटील ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धनके , समन्वयक प्रसाद सांजेकर , उपाध्यक्ष महादेव पांडागळे ,दत्ता कदम , देविदास गायकवाड ,विठ्ठल नरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
पिंपळा खुर्द येथे शालेय वर्ग खोल्यांची कमतरता आहे . शाळेसाठी आवश्यक असलेल्या दोन खोल्या बालाजी अमाइन्स तर्फे बांधण्यात येणार आहेत . त्यासाठी कारखान्याचे व्यापस्थापकीय संचालक राम रेड्डी राजेश्वर रेड्डी यांनी गावकऱ्यांच्या मागणीला सहमती देवुन बांधकामाला मंजुरी दिली दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले . बालाजी अमाइन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून विविध समाज उपयोगी कामांना उदंड मदत करते
यावेळी इंजिनिअर. प्रदीप कोंडले , प्रशांत वैदकर ,पांडुरंग जावळे , विठ्ठल नरवडे ,मनोज पाटील , अगरचंद शिंदे ,माधव मोरे ,अंजली निकते उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार विठ्ठल नरवडे यानी मानले .