उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात जिल्ह्यातील सर्व संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपालासाठी दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी आढावा बैठक संपन्न झाली. 

आढावा बैठकीत ग्रंथपालांना भेडसावणारे प्रश्न, ग्रंथालय आधुनिकीकरण, ग्रंथालयांना उपयुक्त साॅफ्टवेअरस, ॲप इत्यादी बाबीवर सखोल चर्चा, व मार्गदर्शन करण्यात आले. ग्रंथपालांनी सर्व ग्रंथालयात एक प्रकारचे साॅफ्टवेअर्स असावे, पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध करणे, ग्रंथालय नियुक्त कर्मचाऱ्यांना इतर विभागाची कार्य सोपवु नयेत, स्टाॅक व्हेरिफिकेशन नियमावलीत एकसूत्रता आणावी, ग्रंथालय फिस संरचना मध्ये वेळोवेळी वाढ करण्यात यावी, आदि मागण्या केल्या. विद्यापीठ ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. डि. के. वीर यांनी सर्व मागण्यांचा अहवाल विद्यापीठाला सादर करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व ग्रंथपालांच्या वतीने नवनिर्वाचित अधिसभा सदस्य डाॅ. अंकुश कदम यांचा सत्कार करण्यात आला. 

ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डाॅ. डि. के. वीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी सहायक कुलसचिव भगवान भड, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव,  वरिष्ठ ग्रंथालय सहायक तुकाराम हराळकर, कनिष्ठ ग्रंथालय सहायक मल्लिनाथ लामजणे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथपाल बैठकीस उपस्थित होते.


 
Top