उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

    या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनी आणि गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमासाठी महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.विद्या देशमुख, डॉ. स्वाती जाधव, प्रा. स्वाती बैनवाड, प्रा. सुप्रिया शेटे, डॉ.वृषाली बोबडे इत्यादींनी परिश्रम घेतले.

   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top