तुळजापूर/ प्रतिनिधी-

बालेवाडी, पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट अॉलिंपिक गेम्स २०२२ - २३ या स्पर्धेत सॉफ्ट टेनिस क्रिडा प्रकारात प्रियांका हंगरगेकर हिने लक्षणीय कामगिरी केली. प्रियांकाने उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत वैयक्तिक सुवर्ण तर मिश्र दुहेरी प्रकारात रजत पदक पटकावले. 

 यात प्रियांका हंगरगेकर हिची कामगिरी उल्लेखनिय ठरली. तिने अंतिम फेरीत विनिता खेंदाड (बुलडाणा) हिचा पराभव करून सुवर्णपदक पटकावले. पाच सेटच्या सामन्यात सलग तीन सेट जिंकून ३ - ० ने तिने हा अंतिम सामना जिंकला. तसेच सॉफ्ट टेनिस मिश्र दुहेरीमध्ये प्रियांका हंगरगेकर आणि यशराज हुंडेकरी यांनी रजतपदक प्राप्त केले.  या स्टेट अॉलिंपिक गेम्समध्ये उस्मानाबाद सॉफ्ट टेनिस संघ सहभागी झाला होता. या   मुलांच्या संघात आदित्य सापते, स्वराज देशमुख, संजय नागरे, बबलू कावरे, यशराज हुंडेकरी यांचा, तर मुलींच्या संघात प्रियांका हंगरगेकर, प्रेरणा देशमुख, इश्वरी गंगणे, गार्गी पलंगे, प्राजक्ता हंगरगेकर यांचा समावेश होता.

 
Top