तुळजापूर/ प्रतिनिधी-

इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो,असे साकडे आपण देविला घातल्याचे  सांगून सध्या महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न आहेत पण  महाराष्ट्र धर्माध करण्याचा तसेच सामाजिक क्षमतेत विचारधारेत  वेगळाच  प्रयत्न जाणुनबुजुन करण्याचा प्रयत्न केला जातो ,असा आरोप  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंञी  खा. सुनिल तटकरे यांनी गुरुवार दि.१८रोजी  श्रीतुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर पञकारांशी संवाद साधताना केला. 

 तटकरे पञकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, छञपती शिवाजी महाराज , महात्मा फुले , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व महाराष्ट्रातील महिला बाबतीत महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे वक्तव्य केले जातात हे निंदणीय आहे. सध्या चाललेले सर्व प्रकार महाराष्ट्राचा विचारधारेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न जाणुन बुजुन केला जात असल्याने त्यांनी सांगितले. प्रारंभी   हेलिपँडवर राष्ट्रवादी जि. प.सदस्य महेंद्र कावरे यांनी माजी मंञी खा. सुनिल तटकरेचे स्वागत केले .

 तटकरेंनी घेतले देविदर्शन !

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस, कोकणरत्न खा.  सुनील तटकरे यांनी गुरुवारी दुपारी  आई   तुळजाभवानीचे   सपत्नीक दर्शन घेतले .

 यावेळी त्यांच्या सोबत    जिल्हाध्यक्ष  सुरेश   बिराजदार,  महेंद्र धुरगुडे, गोकुळ  शिंदे,   भाई शेख,  विजय सरडे, रुबाब पठाण, शिवाजी सावंत,  बबन गावडे,  खंडोजी जाधव, शहाजी नन्नवरे, बबन गावडे, संदीप गंगणे, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, राजेंद्र गायकवाड, समाधान ढोले, मनोज माडजे, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, गोविंद देवकर, बालाजी कांबळे , पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.


 
Top