उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत (बापू) साळुंके यांच्या प्रयत्नामुळे शहरातील अष्टविनायक चौक, शाहुनगर, बाळासाहेब ठाकरे नगर भागातील नागरिकांची खड्डे आणि धुळीच्या त्रासापासून मुक्तता झाली आहे. भूमिगत गटारीसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यात खड्डे आणि धुळीचा त्रास होत असल्याने श्री.साळुंके यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख आ.कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे पाठपुरावा करुन संपूर्ण रस्त्यावर पाणी मारुन व खड्डे बुजवून घेतले त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात ओळख असलेले प्रशांत (बापू) साळुंके यांच्याकडे नागरिकांनी खड्डे आणि धुळीबाबत तक्रार करुन समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्यानंतर श्री.साळुंके यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्यात पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजवून घेण्याबाबत तसेच धुळीच्या त्रासापासून नागरिकांची मुक्तता व्हावी म्हणून रस्त्यावर पाणी मारण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासनाने दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून धुळ थोपविण्यासाठी रस्त्यावर पाणी मारुन घेतले. ही समस्या मार्गी लावल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

  यापूर्वीही श्री.साळुंके यांनी शहरातील गालिबनगर, सुलतानपुरा, मिल्ली कॉलनीतील नागरिकांची पावसाळ्यात घरामध्ये पाणी शिरत असल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनातील जबाबदार अधिकार्‍यांना प्रतिवादी करत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली. तसेच या भागात स्वाक्षरी मोहीम देखील  त्यानंतर प्रशासनाने दखल घेऊन रस्ते व नाल्याच्या कामाला सुरुवात केली. जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला सातत्याने धारेवर धरुन समस्या मार्गी लावण्याचे काम  सातत्याने केले आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण, युवक, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, नवरात्र व गणेशोत्सव काळामध्ये सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अविरतपणे सुरु ठेवलेले आहे. नवरात्र उत्सवात महिलांसाठी आराधी गीतांचा मेळा, आराधी मंडळांना वाद्य वाटप,  घटस्थापनेसाठी धान्य वाटप यासारखे विविध कार्यक्रम घेऊन महिला वर्गातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर पुरुष बचत गटाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिला आहे.  तसेच निराधार योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना देण्याचे काम केले.

 शिवसेनेत निर्माण झालेल्या दुफळीनंतरही उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणानुसार ते सातत्याने सक्रिय आहेत. नुकतेच पीकविम्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून केलेले शोलेस्टाईल आंदोलन अशा विविध आंदोलनामुळे साळुंके यांनी समाजकार्याबरोबर शिवसेनेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


 
Top