उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बें) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी कुस्ती खेळामध्ये नेत्रदीपक यश संपादन केल्यामुळे  आज (दि.१४) शनिवारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रागणात नूतन गट शिक्षण अधिकारी श्री. असरार अहमद सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्वप्रथम या कुस्ती स्पर्धा बिट स्तरावर करजखेडा ता.उस्मानाबाद या ठिकाणी झाल्या होत्या. बिट स्तरावर टाकळी(बें) जिल्हा परिषद शाळेचे एकूण ९  कुस्तीपटू विजयी झाले होते. त्यांनतर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा ह्या रुईभर या ठिकाणी झाल्या होत्या. यामध्ये टाकळी(बें) जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थी प्रताप नेताजी थोरे,  तेजस्विनी तानाजी थोरे, प्रवीण  नेताजी थोरे,  श्वेता चंद्रकांत सोनटक्के, वैष्णवी उत्तरेश्वर सोनटक्के, धनश्री शिवाजी चौरे या सहा खेळाडूंनी कुस्ती मध्ये नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सहा खेळाडूंची जिल्हा पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली असून द्वितीय क्रमांक मिळविल्या बदल अब्दुला सादिक शेख,कृष्णा  संजय सोनटक्के, श्रेयस जयराम फोलाने आदी खेळाडूंसह त्यांच्या पालकाचा व  खेळाडूंचा सतत सराव करून घेणारे प्रशिक्षक नेताजी थोरे व महादेव सोनटक्के यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवीन गट शिक्षण अधिकारी श्री. असरार अहमद सय्यद, कनगरा बिट केंद्र प्रमुख  श्री.बापू शिंदे, नवनिर्वाचित सरपंच राहुल मसाळ, उपसरपंच दत्तात्रय सोनटक्के, शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षा मोहिनी प्रशांत सोनटक्के, उपाध्यक्ष मतीन पठाण,अनुसया सूर्यवंशी, तंटामुक्त समितीचे  अध्यक्ष काकासाहेब सोनटक्के आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजीव माशाळकर हे उपस्थित होते. 

यावेळी सत्कार सभारंभाच्या कार्यक्रमाला राजर्षी शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर, कनगरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.लोहार सर, ज्योतिराम जाधव, दादा जाधव अनिल सोनटक्के, जमील पठाण राजाभाऊ माने, गणेश सूर्यवंशी, सहशिक्षक श्री.ताणवडे सर, श्री.मस्के सर, श्री.जहागीरदार सर, श्री.हाजगुडे सर, श्रीमती, कुलकर्णी मॅडम, पवार मॅडम, शेख,मॅडम, ,फरताळे मॅडम, अस्मा मॅडम विजापूरे मॅडम यांच्या नागरिक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top