उस्मानाबाद (प्रतिनिधी)

 उस्मानाबाद जिल्हातील व शहरातील इनामी जमीन वर्ग १ कायम ठेवावी या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने कृती समितीची बैठक अध्यक्ष धनंजय शिंगाडे व सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीत  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  काढण्यात येणार असल्याचा ठराव जिल्ह्यातील शेतकरी व समितीच्या वतीने घेण्यात  आला झालेल्या बैठकीत सर्वानुमते सुधीर पाटील यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली 

   उस्मानाबाद जिल्ह्यातील इनामी जमीन वर्ग १ मधून वर्ग २ मध्ये करण्यासाठी २९ मे २०२२ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच दिवसांमध्ये अधिसूचना जारी केली. कोणत्याही हरकती,सूचना न मागवता इनामी जमीन वर्ग १ मधून भोगवटदार १ ची नोंद कमी केली आणि भोगवटदार २ नोंद केली या प्रकारामुळे उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

      यासंदर्भात उस्मानाबाद येथे धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक  घेण्यात आली. यामध्ये शेतकरी बचाव कृती समितीच्या चर्चेनुसार वर्ग २ नोंदीमुळे नजराणा आणि दंडाची आकारणी देखील तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 शेतकऱ्यांसह व्यावसायिकांवर महसूल प्रशासनाने बेकायदेशीर इनामी जमीन वर्ग १ ऐवजी २ करून अन्याय केला आहे. याबाबत आवाज उठवण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चा काढण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या सततच्या प्रयत्नामुळे त्यांच्या अभिनंदनचा ठराव अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी ठराव घेऊन त्याला सर्वानुमते संमती देण्यात आली.

 या बैठकीसाठी नळदुर्ग चे माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, सुरेंद्रनाथ मालशेटवार,मोहम्मद कुरेशी,अकिब कुरेशी, इमाम शेख,मुस्ताक कुरेशी,नेताजी पवार, आनंद पांडागळे,प्रताप कदम,उमेश राजे,सुभाष पवार,संजय पवार,अरुण महाजन,सुधाकर महाजन, दिलीप महाजन, बाबासाहेब कोळेकर, अर्जुन पवार,शिवाजी पवार,रणधीर देशमुख, जयसिंग पवार,ॲड.प्रसाद जोशी,औदुंबर पवार, अरविंद यादव,प्रभाकर घाडगे,उत्तरेश्वर घंदुरे, राजपाल कदम,महादेव घंदुरे,आप्पासाहेब दळवे, विनायक मोघे,प्रकाश जाधव,उद्धव घंदुरे, सत्यवान साळवे,सुशील कदम,बालाजी घंदुरे, अतुल डोलारे,श्रीहरी लोमटे,उदयसिंह राजेनिंबाळकर,अनिल पवार यांची उपस्थिती होती.

 
Top