तुळजापूर/ प्रतिनिधी-,

 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील टीप ओ अंतर्गत पुणे येथील किरण अकॅडमी या कंपनीत दहा जणांची ट्रेनी अभियंतापदी निवड झाली आहे. यासाठी किरण अँकाडमीचे मार्केटिंग मॅनेजर अण्णासाहेब भोसले व कार्पोरेट ट्रेनर गोपाळ गिरासे यांनी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेऊन मुलाखतीतुन निवड केली .

 संगणक शाखेतील अशोक अंबरीकर ,दिशा वडणे, सज्जन प्रसाद, रूपाली लबडे ,रोहित हुलोले, अनुवैजिक व दूरसंचार शाखेतील पल्लवी चपटे, मानसी कुलकर्णी, स्थापत्य शाखेतील करण शिंदे, अमृता मेहेत्रे व यांत्रिकी शाखेतील शुभम कुलकर्णी यांची या कंपनीत अभियंतेपदी निवड झाली आहे. व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे ,प्राचार्य प्रा.रवी मुदकना ,विभाग प्रमुख प्रा.रवींद्र आडेकर ,डॉ. धनंजय खुमणे,प्रा.वैभव पानसरे,टीपीओ प्रमुख प्रा.प्रदीप हंगरगेकर , प्रा.छाया घाडगे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. यासाठी प्रा.संतोष एकदंते,प्रा. दीपक शिंदे , प्रा.संदीप शिंदे, प्रा.महादेव नारायणकर व प्रा. प्रिया सुरवसे यांनी परिश्रम घेतले.


 
Top